प्रोजेक्ट आर्क मध्ये आपले स्वागत आहे
झिनिया फेलोशिप सेंटर
आमच्या सेवा हे आमच्या प्रयत्नांचे, अन्वेषणाचे, प्रयोगांचे, अनुभवांचे आणि ज्ञानाचे फळ आहेत.
या सर्वाचा आरंभ नरक यातनांतून झाला आहे.
कॉन्सर्ट : लव्ह युवर जिंदगी
'आर्क' : अल्को-रिव्हिलेशन कॉन्सर्ट ही एक अद्वितीय प्रस्तुती आहे. या कॉन्सर्ट मध्ये मद्यपाश या आजाराचे नेमके स्वरूप आणि मद्यपाशापासून मुक्ततेसाठी उपाय सांगितले जातात.
ही कॉन्सर्ट सत्य, स्वरूप आणि 'स्वातंत्र्य' (मुक्तीचा मार्ग) यांचा वेध घेते.
ही कॉन्सर्ट अनुभव आणि प्रबोधन यांनी समृद्ध आहे;
तसेच ही कॉन्सर्ट कविता, कथा, विविध प्रसंग व खात्रीशीर उपायांसह आलेल्या सत्य अनुभवांनी सुंदररीत्या सजवली गेली आहे.
रचना, प्रक्रिया आणि मानधन जाणून घेण्यासाठी "बुक द कॉन्सर्ट नाऊ" वर क्लिक करा.
प्रायोजक समर्थित आयोजकांसाठी प्रति कॉन्सर्ट मानधन फक्त 24999 पासून सुरू
कौन्सेलिंग : लाईफ रिकव्हरी
आर्क - अल्को-रिकव्हरी कौन्सेलिंग सेवा, ज्यांना दारूपासून मुक्त होण्याची प्रामाणिक इच्छा आहे अशा मद्यपीडितांना व त्यांच्या परिवार सदस्यांना साहाय्य प्रदान करण्यासाठी आहेत.
हे कौन्सिलिंग सेशन्स पूर्णपणे गोपनीय असतात.
आमच्या सेवांचे मूलभूत आधार पुढीलप्रमाणे...
अनामिकता आमच्या सेवांचा पाया आहे.
कृती हा आमच्यासाठी जादुई शब्द आहे.
निःस्वार्थ प्रेम हे आमचे आनंद तत्व आहे.
सेवा, पद्धती आणि मानधन जाणून घेण्यासाठी "बुक अपॉइंटमेंट नाऊ" वर क्लिक करा.
मानधन फक्त 365 प्रति सेशन पासून
कोचिंग : लाईफ रिस्टोरेशन
आर्क - 7 लेव्हल अॅक्टिव्ह रिस्टोरेशन कोचिंग हे पूर्णपणे सत्यावर आधारित आहे. यात कोणताही तात्विक बडिवार नाही, निरर्थक बडबड नाही आणि कोणताही दिखावा नाही.
जीवनात उन्नती करण्यासाठी, व्यावहारिक आचरणासह वैयक्तिक जीवनातील अनुभव सुधारण्यासाठी ॲक्टिव्ह रिस्टोरेशन कोचिंग मदत करते. तसेच मद्यपीडित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवनातला हरवलेला आनंद परत मिळवण्यास मदत करते.
तपशील, कालावधी आणि मानधनासाठी कृपया "रिझर्व्ह युवर सीट नाऊ" वर क्लिक करा.
मानधन फक्त 1365 प्रति लेव्हल पासून





















